प्रस्तावना :-
समाजातील मतिमंद, कर्णबधिर, दृष्टीहीन, अस्थिव्यंग व कुष्टरोग मुलांसाठी दिव्यांग व्यक्तीकडे त्यांच्या दिव्यांगत्वाकडे न पाहता त्यांच्या मध्ये असलेल्या सामर्थ्याकडे पाहून त्यांच्यामधील असलेले सुप्त सामर्थ्य विकसीत करून त्यांना समाज जीवनाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी सर्व दिव्यांगांना समान संधी सुपुर्ण सदुभाग व त्यांच्या हक्कांचे संरक्षण व्हावे. या दृष्टीने महाराष्ट्र शासनाच्या समाजिक न्याय विभागामार्फत विविध कल्याणकारी योजना राबविल्या जातात. या योजनांची अंमलबजावणी अधिनियम 1995 केंद्रिय कायद्यांची सर्व कामकाज दिव्यांग कल्याण आयुक्तालय, महाराष्ट्र राज्य, पुणे यांच्या मार्गदर्शनाखाली केले जाते. शासन व स्वयंसेवी संस्था या सर्वांचा उद्देश एकच आहे की, दिव्यांग व्यक्तींना सक्षम बनवून त्यांना समाजाच्या मुख्य प्रवाहात सामील करणे हाच आहे.
दिव्यांगांना सहानुभूती नको, संधी द्या; जगा, जगवा, आणि जगू द्या! या महावीरांच्या संदेशाप्रमाणे संस्थेची वाटचाल प्रगतीच्या योग्य दिशेने सुरु आहे. या उपक्रमांस आपल्या सहकार्याची, आशिर्वादाची व प्रमाची मुलांना गरज आहे. हे कार्य निरंतर सुरु राहण्यासाठी कृपया आपण आमच्या संस्थेला एकवेळा आवश्यक भेट देवून उपकृत करावे, ही नम्र विनंती.
उत्कर्ष सेवाभावी संस्था, तागडगाव, संचलित, मतिमंद निवासी विद्यालय, शिरुर (का.) ता.शिरुर (का.), जि.बीड- 413 249